
प्रतिनिधी नागपूर
कामठी /नागपुर -(18 नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात बौद्ध पर्यटनस्थळ म्हणून गाजलेले ड्रैगन पैलेस टेंपल कामठी चा 22 वा वर्धापन दिन येत्या 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत भव्य स्वरुपात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने कामठी येथे विविध सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ड्रैगन पैलेस टेंपल च्या शिल्पकार अँड.सुलेखाताई कुंभारे यांनी दिली.
सन 1999 साली कार्तिक पोर्णिमेच्या पर्वांवर जापान च्या ओगावा सोसायटी च्या अध्यक्षा ओगावा मैडम् यांच्या हस्ते व 110 जपानी भिख्खुंच्या उपस्थितीत ड्रैगन पैलेस टेंपल चे उद्घाटन झाले होते. बोधिसत्व मंजुश्री चा इतिहास जागविणारे, बोधिष्ट राष्ट्र जापान व बुद्धत्वाची ज्ञानप्राप्ती असलेल्या भारत देशाच्या मैत्रीचे प्रतिक म्हणून ड्रैगन पैलेस टेंपल ये जगप्रसिद्ध झाले आहे.
शुक्रवार दि.19 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता कुशीनगर बुद्धगया येथील पुजनिय भदंत ज्ञानेश्वर महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना देण्यात येईल. यावेळी बुद्ध वंदनेत पुजनिय भदंत महापंत,भदंत मेत्तानंद,भदंत नागदिपंकर, तसेच भिख्खु व भिख्खुंनी संघ सहभागी होईल. त्यानंतर उपस्थित भिख्खु व भिख्खुंनी संघास भोजनदान व कठीण चिवरदान अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दुपारी 12:30 ते 4 वाजेपर्यंत हरदास हायस्कूल, ड्रैगन इंटरनेशनल स्कूल व अवंतिका हायस्कूल येथे स्थानिक विद्यार्थी व कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.
ड्रैगन पैलेस टेंपल महोत्सव अंतर्गत दि. 19 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6:30 वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार, समाजभूषण, गीतकार, संगीतकार *आयु. प्रभाकर पोखरीकर (मुंबई)* यांचा *भीमशाही बाणा* हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयु. प्रभाकर पोखरीकर यांनी लिहिलेली छाती ठोकून हे सांगु जगाला,जीवाला जीवाचे दान माझ्या भीमाने केले, हे पाणी आणिले मी माठ भरुनी ई. सारख्या नावाजलेली गाणी गायक सोनु निगम, सुरेश वाडकर,अनुराधा पौडवाल यांच्या मधुर आवाजात गाजलेली आहेत. भीमराज की बेटी फेम शकुंतला जाधव, डॉ. मिनाक्षी डोंगरे, दिनेश हेलोडे, दिपक बनसोडे, राहुल भोसले आदी मुंबई चे गायक कलावंत भीम बुद्ध गीते सादर करतील. यांत यांत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपुर च्या कलाकारांचा ही सहभाग राहणार आहे.
शनिवार दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 :30 वाजता *रविंद्र वानखेडे* यांचा *उत्कर्ष म्युझिकल आर्केस्ट्रा* तर दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 :30 वाजता *शिलवंत सोनटक्के व संच* यांचा *प्रणाम बुद्ध भीम चरणी* भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ड्रैगन पैलेस टेंपल महोत्सवांतर्गत ड्रैगन पैलेस टेंपल परिसरात लघु व सुक्ष्म उद्योग, खादी ग्रामोद्योग, हातमाग, वस्त्रोद्योग, DKMLT, महिला बचत गट,स्वयंसेवी संस्था, यांची *(Exbition-प्रदर्शंनी)* चे आयोजन दि. 19 ते 21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते रात्री 7 वाजेपर्यंत लोकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी एका प्रेस नोटमधुन प्रसिद्धीसाठी दिली आहे.
ड्रैगन पैलेस टेंपल च्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे.