Breaking News

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अभावी रूग्णांचे हाल

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव:-राळेगांव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे कालपासून डॉक्टर नसल्याने रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तालुक्यात सध्या ताप, खोकला, सर्दी अशा विविध आजाराची लागण सुरू आहे.आज सकाळी वाढोणा बाजार येथे जवळपास 70 ते 80 पेशंट दवाखान्यात आले पण तिथे एकच परिचारिका व दोन महिला कर्मचारी हजर होत्या विशेष म्हणजे बाकी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते.अधिकारी तसेच कर्मचारी हे अपडाऊन मध्ये आपला वेळ वाया घालवत असते.आज रोजी शुक्रवारी शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, हे उपचार घेण्यासाठी आली असता तेथे डॉक्टर नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसून खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागला.

यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वाढोणा बाजार येथील प्रकाश पोपट यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन अधिकारी तसेच कर्मचारी का हजर नाही याची सुद्धा उपस्थित कर्मचारी यांना विचारण्यात पण योग्य उत्तर मिळाले नाही जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved