Breaking News

खाजगीकरण, कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाच्या विरोधात

९ ऑक्टोबरला आक्रोश मोर्चा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/चिमूर:-६ सप्टेंबरला २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करुन बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील ६२००० शाळा कार्पोरेट क्षेत्रातील खाजगी कंपन्यांना भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली १० वर्षांपर्यंत दत्तक देऊन छुप्या पद्धतीने खाजगीकरण करण्याचा डाव रचला आहे.२० पटाच्या आतील शाळा समुहाच्या नावाखाली बंद करण्याचा घाट घातला आहे.सुशिक्षीत बेरोजगारांच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या या शासननिर्णयाचा विरोध करण्यासाठी चिमूर तहसील कार्यालयावर ९ आॅक्टोबरला आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या कंत्राटीकरणाचा शासननिर्णय रद्द करण्यात यावा, राज्यातील ६५ हजार शाळांचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे, २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करुन त्यांचे समूह शाळांत रूपांतर करु नये.

सर्व पदांच्या शासकीय भरतीची जाहीरात एम.पी.एस.सी. मार्फत करण्यात यावी, संविधानात दिलेल्या आरक्षणानुसार भरतीच्या जाहीरातीमध्ये सर्वांना जागा देण्यात याव्या, सर्व पदांच्या परीक्षेची फी सर्वांकरिता १०० रु. ठेवण्यात यावी, तलाठी, वनरक्षक आदी परीक्षांकरीता घेतलेल्या १००० रुपयामधुन ९०० रुपये परत करावे, परीक्षा घेण्याकरीता खाजगी कंपनींना कंत्राट देवू नये, परीक्षांत घोटाळा करणाऱ्यांना व्यक्तींना आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात यावी, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या सर्व सेमिस्टरची फी कमी करण्यात यावी, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांची मागील ४ वर्षापासून थकीत शिष्यवृत्ती देण्यात यावी, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या, विद्यापीठाच्या चुकीच्या गुणदान पध्दतीने होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान याबद्दल विभागीय चौकशी करावी, गोंडवाना विद्यापीठात झालेली बोगस प्राध्यापक भरती रद्द करावी, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी व त्यांची मान्यता रद्द करावी, ओबीसींकरीता मान्यता दिलेली ७२ वस्तीगृहे आणि सावित्रीबाई फुले स्वाधार योजना सुरु करण्यात यावी आदी मागण्याचा समावेश आहे.

या मोर्चात गुरुदेव सेवा मंडळ, माना आदिम जमात मंडळ, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, बामसेफ, राष्ट्र सेवा दल, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवक मंडळ, टिपु सुलतान फाउन्डेशन, सरपंच संघटना, गोंडवाना युवा जंगोम दल, ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन, आय. एम.पी.ए. संघटना, अंगणवाडी कर्मचारी सभा, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, शिक्षक भारती, म.रा. प्राथ. शिक्षक समिती, म. रा. जुनी पेन्शन हक्क संघटना, विदर्भ माध्य, शिक्षक संघ, म. रा. शिक्षक परिषद, नेचर फाउन्डेशन, मॅजीक फाउन्डेशन, ऑफ्रोट संघटना, दाई जंगो रायताड बहुउद्देशीय संस्था, छात्रभारती, वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान, प्रजासत्ताक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, नागरीक अधिकार संरक्षण मंच इत्यादी संघटना मोर्चात सामील होणार आहेत. या मोर्चात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा बचाव व खाजगीकरण, कंत्राटीकरण विरोधी कृती समिती यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved