विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:- गेल्या महिन्यात डिसेंबर 5 तारखेला एस. के. सालीमठ कलेक्टर साहेब यांच्यासोबत झालेल्या सोबत बैठकी नंतर शेवगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला होता. गेल्या दहा दिवसापासून पुन्हा 12 ते 14 दिवसाला पाणी येऊ लागले. त्या संदर्भात काल 3 जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालय शेवगाव येथे गटविकास अधिकारी राजेश कदम पाणीपुरवठा एजन्सी मानव कन्स्ट्रक्शन चे ठेकेदार व नगरपालिकेचे संबंधित इंजिनिअर यांच्या सोबत संयुक्त बैठक पार पडली. तसेच येत्या 2 दिवसात पाणीपुरवठा सुरूळीत झाला नाही तर पंचायत समिती शेवगाव व नगरपरिषद शेवगाव कार्यालय यांना कुलूप लावण्याचा इशारा शेवगाव शहर पाणी कृती समितीचे सदस्य प्रेमसुख जाजू व भा.ज.पा प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी दिला.
त्यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष वजीर पठाण माजी नगरसेवक अजय भारस्कर कमलेश गांधी अंकुश कुसळकर दिंगबर काथवटे कमलेश गांधी सामाजिक कार्यकर्ते भूषण देशमुख अँड.शाम कनगरे सुरज लांडे कॉम्रेड संजय नांगरे शेतकरी संघटनेचेदत्तात्रय फुंदे आदी मान्यवर उपस्थित होते
*ताजा कलम*
*शेवगाव शहराबरोबर जोडलेल्या 45 गावांना नियमित पाणीपुरवठा होतो आणि शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कमकुवत कशी झाली हा संशोधनाचा विषय आहे पाणी वितरण व्यवस्थेचे ठेकेदार संबंधित इंजिनियर आणि जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी आणि प. स. कर्मचारी यांची मिली भगत तर नाही ना अशी दबक्या आवाजात चर्चा शेवगाव शहरात सुरू झाली आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*