ब्रेकिंग न्यूज
गदगाव येथील घटना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दिनांक.२४/०१/२०२४ ला ऋषी वानोसा हजारे, वनरक्षक नियतक्षेत्र गदगाव हे सहका-यासह रात्रों १० वाजताचे दरम्यान गस्तीवर असतांना गदगाव – उरकुडपार रस्त्यावर वनक्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गाजवळ रात्रो १०:३० ते ११:०० वाजताच्या सुमारास सोनु धाडसे, रा. तिरखुरा व झिरे बाबु रा. चिमूर या दोघांनी मिळून आमचे रेतीचे ट्रॅक्टर जंगलातील नाल्यावर का चालू देत नाही ? असे म्हणत अश्लील शब्दात शिविगाळ करीत कॉलर पकडून जंगल परिसरातील रोडवरून मारत व ढकलत नेले तसेच खाली पाडून लाथा-बुक्यांनी मारहाण केली.
माझ्या सोबत असलेले जर्नाधन रामचंद्र सातपुते, रा. गदगाव यांनी मला सोडविले त्यानंत्तर ते दोघेही त्या ठिकाणाहून मोटार सायकल घेवून निघून गेले. त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमूर यांना दिली. असता थोड्याच वेळात के. बी. देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकरी (प्रादेशिक) चिमूर, यु. बी. लोखंडे, क्षेत्र सहाय्यक, मुरपार आर. डी. नैताम, वनपाल (स.व.अ.नि.) खडसंगी (चिमुर) अक्षय मधुकर मेश्राम, वनरक्षक नियतक्षेत्र चिमूर, व अमर प्रभुदास पोटे, वनरक्षक (स.व.अ.नि.) खडसंगी (चिमूर) हे घटनास्थळी हजर झाले त्यानंत्तर मी त्यांचे सोबत पोलीस स्टेशन चिमुर येथे जाऊन तक्रार दिली.FIR क्र.००४१ दिनांक २५/०१/२०२४ ला भा. द. वी. कलम ३५३, २९४ ,५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार असल्याने पोलीसांची तपास मोहीम सुरू आहे.