Breaking News

अखेर त्या वेडसर व्यक्तीची न्यायालयाने केली रवानगी

येरवडा येथील वेड्यांच्या इस्पितळात पण त्याच्या बंदोबस्ता साठी शहर बंद ठेवण्याची नामुष्की

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव  9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन महिला अबाल वृद्ध आणि तरुणांच्या मागे लागणारा एक माथेफिरू व्यक्ती शेवगाव शहरातील व्यापारी महिला तरुणी यांच्यामध्ये दहशत निर्माण करत होता सर्वसामान्य शेवगावकरांना आणि नागरिकांना वाईट याची वाटते की एका साध्या येड्या व्यक्तीसाठी शेवगाव शहर बंद ठेवावे लागते गेल्या काही महिन्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात अनेक वेळा शहर बंद ठेवावे लागले याचा गंभीर विचार तालुक्याचे लोकप्रतिनिधी करणार का ??? “प्रशासनामध्येही अनेक वेडसर युसुफ कार्यरत असुन” त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेवगाच्या नागरिकांनी काय केले पाहिजे ??? असा प्रश्न शेवगावकरांना पडला आहे प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यानंतर काही विशिष्ट लोकांना व्ही.आय.पी. वागणूक दिली जाते आणि सर्वसामान्यांना भयंकर त्रास दिला जातो याला जबाबदार कोण???

*ताजा कलम*

*शेवगाव शहरात नव्याने बदलून आलेला एक प्रशासकीय अधिकारी एखादा राजकीय नेता सामाजिक कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य नागरिक त्याकडे वारंवार काम घेऊन गेले असता आपण कोण??? आपलं नाव काय??? मी तुम्हाला ओळखत नाही असे बालिश प्रश्न विचारून अकलेचे तारे कायम तोडत असतो अशा प्रशासनातील अनेक युसुफना कोण आवर घालणार ??? तालुक्याचे लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी अशा गोष्टींकडे कायम बघ्याच्या भूमिकेत दिसत आहे शेवगावकरांची व्यवस्था ‘”आगीतून निघाले आणि फुफाट्यात पडले” अशी झाली आहे*

*विशेष बाब*

*शेवगाव शहरात अनेक माथेफिरू तरुण खिशात अथवा कमरेला धारदार विनापरवाना धारदार शस्त्र बाळगून असतात छोट्या मोठ्या गोष्टीवर हे कानाला कट्टे लावतात प्रशासनातील काही लोकांना याची पूर्ण माहिती असूनही याकडे काना डोळा केला जातो “प्रशासन नेमकं खंबीरपणे कोणाच्या मागे उभा आहे” ??? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved