Breaking News

लोकसभा २०२४ संदर्भात ओबीसी समन्वय समितीची बैठक संपन्न

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-देशात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वत्र निवडणूकच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच दिनांक ३१मार्च रोजी संत तुकाराम हाॅल येथे ओबीसी समन्वय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . बैठकीमध्ये चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवार यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक पक्ष आणि उमेदवाराबद्दलच्या प्रतिक्रिया आणि मते जाणुन घेण्यात आली. प्रत्येक उमेदवारची कार्ये, त्यांची धोरणे, ओबीसी हितासाठी त्यांचे विचार अशा अनेक बाबींवर चिंतन करण्यात आले. सर्वांची मते संमिश्र प्रकारची आल्याने कुण्याही एका उमेदवाराला ठाम पाठिंबा देण्यासाठी एकमत झाले नाही.

यामुळे कुणालाही पाठिंबा देण्यापेक्षा सध्या सदर विषयावर पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले. ओबीसी समितीची पुढिल बैठक समितीच्या संस्थापक अध्यक्षा ऍड अंजलीताई साळवे यांच्या उपस्थितीमध्ये घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्याचा विचार बल्लारपूरचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांनी मांडला. यावेळी कुणीही ओबीसी समाजाला ग्राह्य धरण्याची चुक करु नये असाही इशारा देण्यात आला.सदर बैठकीला एॅड प्रणय काकडे, केशव थिपे,शंकर काळे,साहिल घिवे,संकेत चौधरी, रोहित चुटे, चेतन पावडे, प्रतिक वाटेकर,अनिल वाग्दरकर सर, पोडे सर, माडेकर यांचेसह अनेक ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved