Breaking News

अख्या गावाभोवतीच लावले वनविभागाने ब्रॅण्डेड नेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/सावली:-सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र पेंढरी नियतक्षेत्र पेंढरी मधील मौजा पेंढरी वड हेटि येथे मागील महिन्यापासून वन्यप्राणी बिबट्याने धुमाकूळ घातला असून वन विभागाने सदरच्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी १५ फूट उंचीची ब्रॅण्डेड नेट संपूर्ण गावाभोवतीच लावून गावकऱ्यांना दिलासा दिला.

सविस्तर वृत्त असे की, सावली वनपरिक्षेत्रातील मौजा पेंढरी वड हेटी येथे दिनांक 26.2.2024 रोजी राजेंद्र नामदेव गेडाम यांचे घरील पाळीव कोंबड्या,दिनांक 2.3.2024 रोजी वामन रघुनाथ मडावी यांचे गुरांचे गोठ्यात पहाटेच्या सुमारास बकरी ठार मारले तसेच दिनांक 26.3.2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गुरांचे गोठ्यात शिरून नामदेव केशव गेडाम यांचे बैलास गंभीररित्या जखमी केले.यानंतरही बिबट्याचा गावात शिरकाव नित्याचीच बाब झाली असल्याने गोठ्यातून बकऱ्या, छोटी वासरे तर कधी खुराड्यातून कोंबड्याची शिकार करीत होता. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते.

वरील घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळतात प्रत्येक वेळी ताबडतोब घटनास्थळावर जाऊन मोका चौकशी केली व पंचनामासह नुकसान भरपाईचे संपूर्ण प्रकरण तयार करून मंजुरी करिता वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आले.वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांचे नेतृत्वात पेंढरीचे वनक्षेत्र सहाय्यक अनिल मेश्राम व वनरक्षक सतीश नागोसे यांनी ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे मागोवा घेऊन त्याच्या बंदोबस्तासाठी पेंढरी वड हेटी या संपूर्ण गावाचे सभोवती ब्रॅण्डेड नेट लावल्या गेली तेव्हापासून वन्यप्राणी बिबट्याचा व इतर वन्य प्राण्यांचा गावात शिरकाव होणे व पाळीव प्राण्याचे शिकार होणे बंद झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेऊन वनविभागाचे आभार व्यक्त करून गावकरी आनंदमय वातावरणात गुण्यागोविंदाने राहू लागल्याचे राजेंद्र नामदेव गेडाम या गावकऱ्यांच्या मुलाखतीतून दिसून आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved