जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्याकरीता चिमूर तालूका कॉग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने आज शुक्रवारला सकाळी ठीक 11 वाजता अभ्यंकर मैदान आणि हुत्तामा स्मारक येथे शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शहीद बालाजी रायपूरकर व महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.दरम्यान वीर शहीद हुतात्मे अमर रहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय भारत माता की जय,अशा जय घोषणा देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वक डॉ.सतिश वारजूकर.चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे, तालूका उपाध्यक्ष विवेक कापसे कॉग्रेस जेष्ट नेते धनराज मालके माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके,चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे, शहर उपाध्यक्ष गुरुदास जुनघरे माजी नगरसेवक विनोद ढाकुणकर,शंकरपूर ग्रामपंचायत सरपंच साईश वारजूकर, माजी नगरसेवक तुषार काळे माजी नगर परिषद उपाध्यक्ष तुषार शिंदे माजी बांधकाम सभापती नितीन कटारे, प्रभाकर उपरे अल्पसंख्याक अध्यक्ष आरिफ भाई शेख ॲड धनराज वंजारी वैद्य सर तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर आदी कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.