Breaking News

आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील ३७ मच्छीमार सहकारी संस्थांच्या उन्नतीसाठी दिली आर्थिक मदत

चिमूर तालुक्यातील १४ पैकी १० संस्थाना दिली आर्थिक मदत

आमदार बंटी भांगडिया दरवर्षी मच्छीमार संस्थाना देणार मदतीची साथ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- राजकारण सोबत सामाजिक कार्यात सुद्धा मदत करण्यासाठी आमदार बंटी भांगडिया नेहमीच अग्रेसर असताना नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मच्छीमार संस्थाचे नुकसान झाले आहे. मच्छीमार संस्थांच्या शिष्टमंडळचे मच्छीमार नेते दिवाकर डहारे यांनी आमदार बंटी भांगडिया यांची भेट घेऊन ढिवर समाज व त्यांच्या संस्थांची दयनीय स्थिती संदर्भात माहिती देत उन्नतीसाठी मागणी केली. तेव्हा आमदार बंटी भांगडिया यांनी तात्काळ सहानुभूती दाखवीत मच्छीमार सहकारी संस्थांना प्रत्येकी ५० हजार रूपयेची आर्थिक मदतीचा धनादेश भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे व रमेश कंचर्लावार यांच्या मार्फत चिमूर तालुक्यातील १४ मच्छीमार सहकारी संस्था पैकी १० मच्छीमार संस्थांना क्रांती दिन व जागतिक आदिवासी आणि नागपंचमीच्या औचित्य साधत ५ मच्छीमार सहकारी संस्था अध्यक्ष व व्यवस्थापक यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. तेव्हा आमदार बंटी भांगडिया यांचे आभार मच्छिमार सहकारी संस्थांनी व्यक्त केले.

भाजप मच्छिमार आघाडी तालुका अध्यक्ष दिवाकर डहारे यांनी मच्छीमार सहकारी संस्था चे शिष्टमंडळ आमदार बंटी भांगडिया यांचे कडे जाऊन भेट घेतली. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे ढिवर समाज बांधवांच्या सहकारी संस्था ना नुकसान झाले. तलावातील मच्छी बीज वाहून गेले. संस्थांची स्थिती दयनीय अवस्थेत आहे. संस्थांची आर्थिक अडचण सावरण्यासाठी व समाज, संस्थांच्या उन्नतीसाठी आमदार बंटी भांगडिया यांनी मदत करावी अशी मागणी ढिवर समाजाचे नेते दिवाकर डहारे केली असता आमदार बंटी भांगडिया यांनी तात्काळ मच्छीमार सहकारी संस्था ना ५० हजार रू.आर्थिक मदत देण्याचा शब्द दिला.

ढिवर समाज व त्यांच्या सहकारी संस्था चा विकास व्हावा, समाजाची उन्नती व्हावी यासाठी आमदार भांगडिया सदैव आपल्या पाठीशी राहणार असून आपण ही येणाऱ्या काळात आमदार बंटी भांगडिया सोबत राहण्याचे मच्छीमार संस्था ना धनादेश सुपूर्द करीत असताना च्या प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांनी सांगितले.

चिमूर विधानसभा क्षेत्रात ३७ मच्छीमार सहकारी संस्था ना प्रत्येकी ५० हजार रू. मदतीचा शब्द देत आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूर तालुक्यातील १४ पैकी १० मच्छी मार सहकारी संस्था ना दिलेला शब्द पूर्ण करीत प्रत्येकी ५० हजार रू. धनादेश भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे व रमेश कंचर्लावार यांच्या मार्फत मच्छीमार सहकारी संस्था ना सुपूर्द करण्यात आले.त्यात जनसेवा मच्छीमार सहकारी संस्था सिरपूर, मच्छिन्द्र सहकारी संस्था नवतळा, विकास मत्स्य व्यवसायिक संस्था काजळसर, मोटेगाव मच्छीमार सहकारी संस्था, आदर्श मच्छीमार सहकारी संस्था पेंढारी( केवाडा ), मच्छिन्द्र संस्था पिपर्डा, श्रीराम मच्छीपालन सहकारी संस्था पळसगाव, श्रीराम बहूउद्देशीय मत्स्य पालन संस्था विहिरगाव, वाल्मिक मत्स्य पालन संस्था तळोधी (नाईक) या सहकारी संस्था ना प्रत्येकी ५० हजार रू. धनादेश प्रदान करण्यात आले असून दरवर्षी संस्थे च्या जॅकेट, जाळे खरेदी साठी व उन्नती साठी मदत देणार असल्याचा शब्द देण्यात आले.

मच्छीमार संस्थाना धनादेश सुपूर्द करीत असताना भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगेश धाडसे,रमेश कंचर्लावार, अर्जुन थुटे, विलास कोराम, नेरी भाजप जिप क्षेत्र प्रमुख संदीप पिसे, मासळ भाजप जिप क्षेत्र प्रमुख प्रवीण गनोरकर, महादेव कोकोडे, दिवाकर डहारे, रमेश भोयर, जिवन नागोसे, तसेच नंदू हटवादे, दिलीप पेटकूले, प्रदीप सुकारे, यशवंत भानारकर, प्रशांत अंदनसरे, विजय वसाके, दशरथ सहारे, विनायक ठाकरे, सरपंच आकाश भेंडारे, सौ वर्षां लोणारकर, जानिक बनसोड, ज्ञानेश्वर गुरनुले, घनश्याम बोरकर, केशव घरत, सलीम शेख अंकुश मेश्राम अनिल बारेकर, यादव पोइनकर, गजानन देशकर, मधुकर दांडेकर, दशरथ आदे तसेच मच्छीमार संस्थेचे विलास डहारे, अनिल शिवरकर, विश्वास सामुसाकडे, मनोहर मेश्राम, यादव मेश्राम, नंदू मानकर, संजय मेश्राम, विनोद आत्राम, चरणदास मोहीनकर सह आदी मच्छीमार बांधव उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार आरोपींना उत्तरप्रदेशामध्ये अटक

शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तरप्रदेशातील वृंदावन, मथुरा येथे सापळा रचून पकडले ‘नगर …

पिडीत वैद्यकीय विद्यार्थिनीचा समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनचे आंदोलन

कलकता येथील घटनेचा निषेध उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन चिमूर येथील डॉक्टराच्या आयएमए, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved