कँन्सरग्रस्त रुग्णाला आमदार बंटी भांगडिया कडून आर्थिक मदत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- संजय गांधी निराधार समिती चिमूर ची मिटिंग दिनांक १३ ऑगस्ट तहसील कार्यालय मध्ये समिती अध्यक्ष संजय नवघडे यांच्या अध्यक्ष तेखाली झाली असून या मिटिंग मध्ये ६५० प्रकरणे मंजूर करण्यात आले तर ५२ प्रकरणे नामंजूर करण्यात आले.
आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनात चिमूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेत लाभ मिळवून देण्यासाठी समिती कार्यरत असून शेकडो लाभार्थ्याना लाभ मिळवून देण्यात येत असल्याचे संजय नवघडे यांनी सांगितले.श्रावण बाळ योजना २८३, इंदिरा गांधी वृद्ध बिपीएल १६६, संगायो विधवा उत्पन्न ९२, इंगायो विधवा बिपीएल ३८, संगा अपंग व इतर ७१ प्रकरणे मंजूर करण्यात आले आहे.
कँसरग्रस्त रुग्णाला आमदार बंटी भांगडिया कडून आर्थिक मदत
चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील रुग्णाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या कडून एक हात मदतीचा पुढे करून गरीब कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. नेरी येथील सोपिया आशिष बावणे या महिलेला दोन चिमुकले मुले असून सोपिया कँन्सरग्रस्त रुग्ण असल्याकारणाने तिच्या नवऱ्याने मालेवाडा येथील तिच्या वडिलाकडे सोपियास सोडून दिले.
मात्र वडील केशव शंकर पोइनकर यांची परीस्थिती अत्यंत हालाखीची व गरीब असल्याकारणाने त्यांनी आमदार बंटी भांगडीया यांच्या सहकार्याने आपरेशन करुन घेतले. परंतु नंतरचे औषधोपचार त्याच्या अवाक्याबाहेर होत होते, वडिलाचे हृदय स्वस्थ बसू देत नव्हते, त्यांनी आमदारांना संपूर्ण आपबिती ऐकवली असता, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे यांचे मार्गदर्शनात मालेवाडा येथील राहते घरी तात्काळ आर्थिक मदत नेऊन दिली.