Breaking News

SC,ST क्रिमिलेयर आणि उपवर्गीकरन हटवण्याबाबत राष्ट्रपतींना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-१ ऑगस्ट २०२४ रोजी सुप्रीम कोर्टाने क्रिमिलेयर आणि उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निकालामुळे ST, SC आणि OBC आरक्षण धोक्यात आले आहे. यामुळे शिकलेल्या पहिल्या पिढीला पुढे जाण्याचा रस्ताच बंद होणार आहे. वरकरणी हे निर्णय स्वागतार्ह वाटत असले तरी त्यामागील डाव भयंकर आहे. यासंदर्भात आवश्यक सुधारणा होण्यासाठी राष्ट्रपती भारत सरकार यांना चिमूरचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात SC, ST वर्गात उपवर्गीकरण करण्याचे धोरण ठरविण्याचा अधिकार व क्रिमीलेयर वगळण्याचे नियमन करण्याचे राज्यांना अधिकार देणारा निर्णय दिला. SC, ST प्रतिनिधीत्व व समुदायाबाबत संविधानातील मूलभूत कलम १५-४,१६-४,३४१,३४२ चे अधिष्ठान झुकविणारे आहे. यातून उपवर्गीकरण प्रकाराने जाती जातीत भेदभाव निर्माण करणारे संकेत दिसतात.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सुधारणा करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते ऍड.भूपेश पाटील,सुरेश डांगे,रामदास कामडी,रावन शेरकुरे,कैलाश बोरकर, संजय सर,आशिष वाघमारे,मनोज राऊत, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved