शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी गोंडवाना विद्यापीठाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.विद्यापीठाने ५ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेमुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अडचणीत आली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.जिवतोडे यांनी विद्यापीठाला विनंती केली आहे.
की, “कॅरी फॉरवर्ड” पद्धतीबाबत असलेला संभ्रम दूर करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश मिळावा. यासह त्यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत.यामध्ये समकक्षता पत्र तातडीने निर्गमित करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेतले अडथळे दूर होतील. तसेच प्रवेशाची अंतिम तारीख वाढवून ३० सप्टेंबर २०२४ करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल व प्राचार्य, विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांना स्पष्ट मार्गदर्शनपर सूचना देऊन त्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा अशी मागणी केली आहे.मुकेश जिवतोडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठाने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच उभे आहोत.