जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आमदार बंटी भांगडिया यांनी खडसंगी येथील माँ मानिका देवी सभागृह बांधकाम साठी दोन कोटी रुपये देऊन अवघ्या आठ महिन्यात भव्य असं सभागृह बांधकाम पूर्ण करण्यास त्यांना यश आले. आमदार बंटी भांगडिया यांचे जंगी स्वागत करण्यात आले.आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आपण केलेले समाज हिताचे काम, आपल्या वरील प्रेम, विश्वास, आशीर्वाद यामुळे सेवा कार्य करीत असून शासनाच्या विविध योजना सांगत सदैव मी माना समाजाच्या पाठीशी राहण्याची ग्वाही देत दिनांक २ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी च्या प्रांगनात लोकार्पण सोहळा प्रसंगी आमदार बंटी भांगडिया बोलत होते.
यावेळी मंचावर माना समाज युवा नेते राहुल दडमल, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे,भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार , माजी सभापती मजहर शेख,जेष्ठ नेते मजहर शेख,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौं माया नन्नावरे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगेश धाडसे माजी पस सदस्य अजहर शेख, किसान नेते एकनाथ थुटे, भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बनसोड,सरपंच प्रियंका कोलते, रणजित सावसाकडे, पुरुषोत्तम गायकवाड प्रभाकर दोडके, वेणूदास बारेकर हेमंत जांभूळे, विनोद रणदिवे, युवा मोर्चा चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर,कवडू खडसंग, सौ. छायाताई कंचर्लावार आदी उपस्थित होते. दरम्यान ग्रामदर्शन विद्यालय च्या वतीने संस्थेचे विनोद रणदिवे, प्राचार्य सदाशिव मेश्राम यांनी आमदार बंटी भांगडिया यांचे शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. डॉ. दिपक दडमल, नितेश दोडके यांच्या टीम ने सुद्धा आमदार भांगडिया यांचा सत्कार करण्यात आला.
वसंत धुर्वे नामक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्या ने खडसंगी भाजप कार्यकर्त्यांनी स्वतः कडून वर्गणी गोळा करीत झालेली रक्कम सहानुभूती मदत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते मृतक च्या पत्नीस देण्यात आली.
संचालन राकेश जिवतोडे यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद श्रीरामे यांनी केले. खडसंगी जिप क्षेत्रातील मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते. रोशन बनसोड, मनी रॉय, दशरथ नन्नावरे व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कार्यक्रमसफल केला.