Breaking News

काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून तळोधी नाईक कांग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक हे गाव राजकीय महत्व प्राप्त आहे तळोधी ग्रामपंचायतवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे, परंतु कॉग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया याचा होत असलेला विकासाचा सपाटा बघून प्रेरित होऊन भाजपात प्रवेश केला यामुळे पुन्हा भाजप मजबुतीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

आमदार बंटी भांगडिया यांच्या नवीन वाड्यावर प्रवेश प्रसंगी भाजप जेष्ठ नेते राजु देवतळे, पस माजी सदस्य अजहर शेख,भाजपा युवा नेते समीर राचलवार,संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय नवघडे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे,तळोधी चे माजी सरपंच कलीम शेख, निलेश गभणे,युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, तळोधी येथील भाजपा नेते नामदेव नन्नावरे, वनसमिती अध्यक्ष किशोर येसांबरे, भाजपा युवा नेते अविनाश सोनवाने, गोवारी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र नेवारे, टेकेपार आदिवासी सोसायटी उपाध्यक्ष रमेश भोयर, माधव वांढरे, नथुजी श्रीरामे, अशोक नेवारे,बूथ अध्यक्ष अंकुश मेश्राम,सलीम शेखआदी तळोधी (नाईक) भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वडकी येथे लाडक्या आदिवासी विकास मंत्र्याचे जंगी स्वागत

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नवनिर्वाचित चंद्रपूर …

शेतीच्या बारमाही पाण्यासाठी 26 जानेवारी पासुन अन्नत्याग आमरण उपोषण

विशेष प्रतिनिधी शिंदखेड :- खडकपूर्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यां वरील लघुप्रकल्प हे संत चोखामेळा सागरातील अतिरिक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved