भरधाव कारने दुचाकीस्वारास चिरडले
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात शेंबळ गावाजवळ घडली घटना.वरोऱ्यावरून शेंबळ येथील नातेवाईकाच्या भेटीला जात असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव वेगात असलेल्या हेक्टोर कारने जबर धडक दिली. यात दुचाकी स्वराचा जगीचा मृत्यू झाल्याची घटना वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील शेंबळ गावाजवळ दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. प्रवीण रामकृष्ण वाभीटकर (45) रा. वरोरा असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार वरोरा शहरातील कापड व्यावसायिक प्रवीण वाभीटकर हे शेंबळ येथे राहत असलेल्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी हीरो होंडा दुचाकी क्रमांक एमएच 34 एसी 2839 ने जात असताना शेंबळ गावाच्या वळणावर वणी कडून वरोरा कडे येत असलेली भरधाव हेक्टोर कार क्रमांक एमएच 29 बीपी 7722 या वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली.यात दुचाकीस्वार प्रवीण वाभीटकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळ वरुन कारचालक पसार झाले होते. प्रवीण वाभीटकर यांच्या पश्चात पत्नी, व तीन अविवाहित मुली आहे. घरचा करता व्यक्तीच गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.