जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- मागील १५ दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिला व्यापारी अरुणा अभय काकडे ह्या बेपत्ता झाल्या होत्या. १५ दिवसानंतर त्यांचा शोध लागला. आज दिनांक ११ डिसेंबरला दुपारी दोन वाजता अरुणा काकडे यांना अग्नीच्या साक्षीत अंतिम श्रद्धांजली अर्पण करुन दिला अखेरचा निरोप.देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका चिमूर व्यापारी असोशियनच्या सदस्या अरुणा अभय काकडे वय ३७ वर्ष २६ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे इतवारा मार्केट मधे सामान खरेदी करण्याकरिता गेल्या होत्या.
संध्याकाळ होऊनही अरुणा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र विचारपूस केली मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही.अखेर चिमूर येथे मीसिंग तक्रार दाखल केली.चिमूर पोलिसाणी चौकशी करीत आरोपीचा शोध घेतला. व आरोपीच्या बयानावरून पोलिसांनी मृत्युदेह शोधून काढला. आज दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास वडाळा पैकु चिमूर मोक्षधाम येथे हजारो नागरिकांच्या उपस्थित अरुणाला अंतिम निरोप देण्यात आला. त्यांच्या मृत्यूपच्यात पती व मुलगा देवांश आहे.