* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर क्रांती भूमीचे रहिवासी आणि विस टक्के राजकारण व अंशी टक्के समाजकारण अशी भूमिका ठेवून ज्यांनी राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले असे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे प्रभावशाली आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी चिमूर विधानसभा मतदार क्षेत्रातुन सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकुन विजयाची हॅट्रीक पुर्ण करीत इतिहास रचला आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे बलाढ्य नेते डॉ.सतीश वारजुकर यांच्याशी लढत देत आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी ९,००० मतांनी वारजुकरांचा पराभव करून विजय मिळवला. भांगडीया यांनी सर्व मतदारांचे आभार मानले, कार्यकर्त्यांनी चिमूर शहरातुन विजयी रॅली काढून जल्लोष साजरा केला. दिलेला शब्द पुर्ण करणारा आमदार म्हणून किर्तीकुमार भांगडीया यांची चांगलीच ओळख आहे. त्यांनी चिमूर जिल्हा बनविणार असे आश्वासनच नाही तर काळा दगडावरील रेष आहे असे म्हटले होते. आतातर भाजपाचीच सरकार आहे मग दिलेला शब्द पुर्ण करतील का कारण चिमूर जिल्ह्याची मागणी खूप वर्षापासून रखडली आहे. आतातरी चिमूर जिल्हा बनणार का अशी चर्चा नागरिक चौकाचौकात करीत आहे.
* चिमूर जिल्ह्यासाठी जनतेची मागणी *
चिमूर विधानसभा क्षेत्रातून दोन वेळा आमदार झालेले बंटी भांगडीया यांनी तिसऱ्यांदा नशीब आजमावत हॅट्रीक पूर्ण केली. आता आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांचे कडून चिमूरकरांच्या जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या.