जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील मौजा कोलारा-तुकम येथे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मनेरगा मधून अनेक महिन्यापासुन नियोजीत जागेकरीता प्लेवर ब्लॉक ( गटू ) मंजुर असतांना सुद्धा संबंधीत कत्राटदार उडवाउडवीचे उत्तर ग्राम पदाधिकारी व ग्रामस्थानची दिशाभुल करीत आहे.कामाबदल अनेकदा सरपंच / सदस्य बांधकाम विभाग कार्यालयात जावून निवेदन दिले परंतु निवेदनाची दखल घेतली जात नाही.नियोजीत जागेवर काही दिवसातच मॉ मानिका परिसरात कार्यक्रम आहे तर श्री गुरुदेव सेवा मंडळ मध्ये तुकडोजी महाराज याची पूण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आली आहे.
तेव्हा संबंधीत संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतला विचार करीत असतात तेव्हा तात्काळ ग्रा.प.यानी सार्वजनिक बांधकाम विभाग चिमुर ला संबंधीत कत्राटदारावर कार्यवाही करून त्याचा कंत्राट रद्द करण्याचा संबंधीतचा पत्र दिला गेला आहे.
” गटू च्या संबंधीत अनेकदा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केला तर निधी उपलब्ध नसल्याचे कारणे सांगुन उडवाउडवीचे उतर देतात मग निधीच उपलब्ध नाही तर नियोजीत जागेवर १ / १ गटूची गाडी निधी आली काय ? नियोजीत जागेवर १ गाडी आणुन ग्रामस्थानाची दिशाभुल करीत आहे “