देशाच्या जळणघडणेत महत्वाचा घटक म्हणजे पत्रकार –ठाणेदार संतोष बाकल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- व्हॉइस ऑफ मीडिया तालुका चिमूर च्या वतीने आयोजित श्रीहरी बालाजी देवस्थान येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांन्भेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल, प्रोफेशनल पीएसआय जाधव, रत्नमाला पतसंस्था अध्यक्ष अमित भिमटे,चिमूर का छोकरा पसारकर,व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष राजु रामटेके जिल्हा कार्याध्यक्ष बालू सातपुते माजी तालुका अध्यक्ष रामदास हेमके मंचावर उपस्थित होते.
संचालन जितेंद्र सहारे तर आभार योगेश सहारे यांनी केले.यावेळी संपादक सुरेश, डांगे, उपसंपादक विलास मोहीनकर,संजय नागदेवते, फिरोज पठाण, गुणवंत चटपकर, उमेश, शंभरकर, सुनिल हिंगणकर, प्रमोद राऊत, विकास खोब्रागडे, रामदास ठुसे, शार्दूल पचारे,भरत बंडे आदी उपस्थित होते.