पकडलेला ट्रॅक्टर येवती या गावातील
अशीच कार्यवाही पुढेही सुरू राहावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुका सध्या सर्वत्र अवैध रेतीची वाहतूक होत असताना तालुकअंतर्गत येत असलेल्या चहांद येथे दि. ४/१/२०२५रोजी रात्री १० वाजता तलाठी कार्यालयाजवळ सापळा रचून महसूल अधिकाऱ्यांनी येवती येथील ट्रॅक्टर क्रं. एम एच २९ बी सि ७३७४व ट्राली क्रं एम एच २९सि बी ३८४५ सदर ट्रॅक्टर एक ब्रास रेती चोरून घेऊन जात दिसला व तो महसूल विभागाचे अधिकारी बघून पळायला लागला तेव्हा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत ट्रॅक्टर पकडण्यात आला.सदर ट्रॅक्टर हा येवती येथील कैलास अराडे यांच्या मालकीचा असून ड्रायवर चहांद येथील शंकर उर्फ महेश धोबे चालवीत होता.सदरची कारवाही एस.डी.ओ.विशाल खत्री व तहसीलदार अमित भोईटे राळेगाव यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी महादेव सानप व दिलीप चिडे, यांनी पार पाडली सोबत महसूल सेवक मनोज आत्राम,उमेश चांदेकर,रुपेश पेचे, सुनील कुऱ्हे हे अधिकाऱ्यासोबत होते.
महसूल विभागाने केलेल्या कार्यामुळे अवैदरीती वाहतूक करणाऱ्या चे धाबे दणाणले आहे. हे अवैध रेती चोरून गोरगरीब जनतेना देत त्यांना महागात विकतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेची पैशाची लूट करीत आहे तसेच राळेगाव तहसील समोरून नेहमी चालणाऱ्या अवैद्य टिप्पर वर जास्त प्रमाणात कारवाई करण्यात येत नाही यामुळे काही महसूल कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे हे विशेष! मात्र मंडळ अधिकारी महादेव सानप व दिलीप चिडे व यांच्या सोबतीत पथकाने रात्री दहा वाजता कार्यवाही करून अवधरेतीचा ट्रॅक्टर पकडला याबद्दल या महसूल कर्मचाऱ्या बद्दल जनतेत आदर निर्माण झाला असून यापुढे अशाच प्रकारच्या अवैध धंद्यावर आळा घालावा अशी सर्वसामान्य जनतेकडून मागणी होत आहे.सदर अवैध रेतीचा पकडलेला ट्रॅक्टर महसूल कर्मचाऱ्यांनी वडकी पोलीस स्टेशनला जमा केला आहे.