
नितिन गडक़री, देवेंद्र फडणवीस, सुलेखाताई कुंभारे उपस्थित राहणार
नागपुर:- स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतील भाजपा चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आपला उमेदवारी अर्ज उद्या सोमवारी, दि. २२ नोव्हेंबर रोजी भरणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितिन गडक़री,माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संस्थापक सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी १०.३० वाजता सर्व भाजपा नेते आणि पदाधिकारी आकाशवाणी चौकात एकत्र येतील आणि तेथून सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जातील. यावेळी निवडणूक प्रमुख आमदार प्रवीण दटके- *सह- निवडणूक प्रमुख डॉ राजीव पोतदार*,खासदार डॉ विकास महात्मे,
माजी खासदार अजय संचेती,जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये,आ. टेकचंद सावरकर,आ.समीर मेघे,आ.गिरीश व्यास,आ.कृष्णा खोपड़े,आ.विकास कुंभारे,आ.मोहन मते, आ.ना.गो गाणार,महापौर दयाशंकर तिवारी,उपमहापौर मनीषा धावड़े,सत्ता पक्षनेता अविनाश ठाकरे,स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर,माजी आ.सुधाकर देशमुख,अनिल सोले,सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी,सुधीर पारवे तसेच चरणसिंग ठाकुर यांच्यासह भाजपा पदाधिकारी,नगरसेवक, जिल्हापरिषद,नगरपालिका आणि पंचायत समिति चे सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.