
- विशेष प्रतिनिधी
शेवगांव :- शेवगांव शहराची भली मोठी बाजारपेठ सराफ बाजार जैन गल्लीचा कापड बाजार मुख्य बाजारपेठ मार्केटकमिटीची बाजारपेठ आंबेडकर चौक पैठण रोड नेवासा रोड सर्व मिळुन अवघ्या तीनच मुताऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोतनीस हॉस्पिटल मागील मुतारीच्या दुर्घन्धीचा त्रास परिसरातील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना कायम होत असतो, दुसरी मुतारी काझी गल्ली भागातील मुतारीचा त्रास या भागातील नागरिकांना होत, असतो तिसरी मुतारी सम्राट अशोकनगर च्या कमानीच्या जवळ असलेली मुतारी कायम अस्वछ असते याचा त्रास परिसरातील दुकानदारांना आणि चर्च मधील नागरिकांना होत असतो, याची गंभीर दखल नगरपालिका घेणार का??? आणि
“भविष्यात बाजारपेठेच्या लगत सर्व सोयींनी युक्त सुलभ शौचालय होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया”
दरवर्षी घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यवधींचे टेंडर फ्लॅश करणारी शेवगांव नगरपरिषद सार्वजनिक आरोग्यावर मात्र हात आखडता का घेत आहे??? बाहेर गावाहून येणाऱ्या महिलांना या गैरसोयीच्या ठरत आहे, नागरपरिषदें मध्ये निम्म्या महिला प्रतिनिधी असताना सुद्धा व प्रथम नगराध्यक्षा आणि दुसऱ्या टर्म ला सुद्धा महिला नगराध्यक्षा होत्या तरी त्यांनी या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.