
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – वरोरा तालुक्यात असलेल्या जी एम आर,वर्धा पावर, एकोना कोलमाईन्स आदि कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा.तसेच गौण खनिज बाबत सुद्धा कार्यवाही व्हावी आदि समस्यांबाबत तालुका प्रशासनाला तसेच कंपनी व्यवस्थापनाला युवासेना उपजिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांनी निवेदन सादर केली.परंतु प्रशासनाने युवसेनेच्या निवेदनाचे माध्यमातून केलेल्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याने
युवसेनेच्या वतीने समस्या सोडविण्यासाठी एक मोठे आंदोलन करण्याचा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांनी दिला आहे.
वरोरा तालुक्यात जी.एम.आर ,वर्धा पावर,एकोना कोलमाईन्स ,अग्रवाल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर , एमटा नावाने भद्रवतीत असलेली कोलमईन्स ,माजरीक्षेत्रात असलेले सर्व प्रा. ली कंपनी , के एन पी (महालक्ष्मी) इंटरप्रायजेस , सुरू होत असलेली स्टील प्लान्ट, कंपन्या आहे.परंतु तालुक्यात कंपन्या विस्थापित असतांना स्थानिक बेरोजगार युवकांना डावलून परप्रांतीयांना रोजगार दिला आहे.
तसेच एकोना माईन्स मधून वीज कंपन्यांना कोळसा पुरवठा होत असतो.कोळसा वाहतूक ग्रामीण भागातील रोड ,शहरातील रोडवरून होत असते.सदर कोळसा वाहतूक हि वरोरा शहरातील रस्त्यांवरून होऊ नये यासाठी युवासेना जिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांनी शहरातून होणारी कोळसा वाहतूक रोखली असता आणि पोलीस प्रशासनाचे लक्षात आणून दिले.उलट पोलीस प्रशासनाने आलेख रट्टे यांना तुम्हाला वाहने रोखण्याचे अधिकार नाही.वाहने रोखू नये अशी दमदाटी देण्यात आली असल्याचे आलेख रट्टे यांनी सांगितले आहे.
अग्रवाल ग्लोबल कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिज साठवणूक त्यांचा प्लॅन्ट मदे केली असून वाहतूक सुद्धा सुरू आहे.गौण खनिज साठवणूक किंवा वाहतुकीचा रितशिर परवाना प्रशासनाने दिला का असा प्रश्न उपस्थित करीत युवासेनेचे वतीने निवेदन सादर करण्यात आले.परंतु प्रशासनाकडून आजमितीला कोणतीही कार्यवाही झाली नाही.प्रशासन व कंपनी व्यवस्थापन यामध्ये कुठे तरी पाणी मुरत असल्याचा आरोप आलेख रट्टे यांनी केला आहे.