Breaking News

गाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

प्रतिनिधी – कैलास राखडे

तळोधी :- तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत, आलेवाही बिटातील वाढोणा येथील गाव परिसरात आज सकाळी एक अस्वल आणि तिचे दोन पिल्ले लोकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लोकांनी खूप मोठी गर्दी झाली असता अशा वेळेस कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून वन विभागाची टीम, परिसरातील पी.आर.टी. चे सदस्य, व स्वाब नेचर केअर संस्था चे सदस्य यांनी अस्वल असलेल्या स्थळी जाऊन अस्वलीला तिच्या पिलांसह जंगलाच्या दिशेने हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्साही असलेल्या लोकांनी रस्त्यावर गर्दी करून रस्ता अडवल्यामुळे त्या अस्वलीला तिच्या पिलांसह जंगलाकडे हकलता आले नाही. त्यामुळे शेती परिसरातील नदीकडे अस्वल निघून गेली.

त्यामुळे शेतामध्ये काम करणारे व परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतातील काम सुरू असल्याने शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजूर त्यांच्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून वन विभाग पी.आर.टी. टीम व स्वाब नेचर केअर चे सदस्य यांनी परिसरात गस्त सुरू ठेवलेली आहे. व लोकांना सावधानता बाळगण्याची सूचना दिलेली आहे.


यावेळी तळोधी बा. परिक्षेत्राचे क्षेत्र सहायक कार्तिक गरमळे, एस.एस.कुळमेथे वनरक्षक गंगासागर (हेटी) , वनचौकीदार उईके, तथा पी..आर.टी. ची चमू, व स्वाब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष यशवंत कायरकर , सदस्य महेश बोरकर, सचिन निकुरे, वेदप्रकाश मेश्राम, व इत्यादी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved