जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या सिरपूर येथील युवकाने २५ फेब्रुवारी ला रात्रौ १:३० वाजता दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली, सविस्तर असे की सिरपूर येथील राजकुमार खुशाल मडावी वय ३५ वर्ष हा चिमूर येथे सासू सासऱ्याच्या घरी वास्तव्यास होता नगर परिषदेच्या कामावर जात होता दोन दिवसांपूर्वी पत्नी सोबत भांडण झाल्यामुळे तो स्वगावी सिरपूर परत आला आणि उदास राहू लागला अशी गावात जोरदार चर्चा आहे,
दि २५ फेब्रुवारी ला सर्व गाव शांत असताना घरात आई झोपली असताना स्वतः च्या घरातील शौछालयात जाऊन रात्री एक ते दिड वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली काही वेळा नंतर मुलगा दिसंत नाही म्हणून आईने वॉर्डात आरडा ओरडा केला या आरडाओरडा ने लोक जागे झाले लोकांनी शोधाशोध केली असता संडास चा दरवाजा बंद असल्याचे आढळून आले दरवाजा खोलून पाहिले असता राजकुमार हा फासावर लटकला असल्याचे दिसताच,
लोकांनी पोलिस पाटील यांना माहिती दिली व पोलीस पाटील यांनी चिमूर पोलिसांना फोन करून माहिती दिली व पोलीस घटनास्थळी येऊन मोका पंचनामा करून उततरनिय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले, राजकुमार च्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध आई आहे. त्याच्या अशा अकस्मात केलेल्या आत्महत्येमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त जात आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे