
उपविभागीय अधिकारी चिमूर यांना दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक ०९/०३/२०२२ ला उपविभागीय अधिकारी यांना काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन देण्यात आले. दिनांक.१६/०१/२०२२ ला चिमूर शहरातील सोनेगांव बेगडे ते पिटीचुआ रोड येथील बांधकाम विभागा अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकामावर अवैध रेतीची तस्करी केल्याबाबत स्थळदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी (पटवारी) यांनी मिळून नायब तहसिलदार तुळशीराम कोवे यांचे आदेशाने तयार करण्यात आला. त्यामध्ये जे एन ट्रेडर्स मटेरियल सप्लायर्स मेन रोड मोखारा तह. पवनी, जि. भंडारा प्रो. जितेंद्र सु. नखाते मो. नं. ९९२३५०१७८३ यांचे नावाचे गाडी नं. एम एच ३६ ए ए १५०७ तसेच गाडी नं. एम एच ३६ ए ए ७१३६ नंबरच्या गाडीने रेती वाहतुक केल्याबाबतचे कंत्राटदार यांनी पास दाखविली व तलाठी, मंडळ अधिकारी यांनी याबाबतची तपासणी केली व पंचनामा तयार केला.
त्यानंतर चिमुरचे तहसिलदार प्राजक्ता बुरांडे तसेच नायब तहसिलदार तुळशीराम कोवे यांचेकडे स्थळदर्शक पंचनामा सादर केला. नंतर ठेकेदार सुनिल मोरेश्वर वासाडे रा. नागपूर यांना माहिती विचारली असता त्यांनी अर्जाद्वारे मौजा सोनेगांव बेगडे येथे १० ग्रॉस रेती मी स्वतः रॉयल्टी विकत घेवून मी त्या रोडच्या कामाकरीता वापर केला आहे. असे असतांना सुध्दा हेतुपुरस्सर धर्मपाल केवलराम अंबादे रा. नेरी यांचे नावे दंड आकारण्यात आला, हे कसे काय ? सदर मंडळ अधिकारी यांनी पंचनामामध्ये मी टिपी बुक पावती सादर केलेली आहे. त्यामध्ये कोणताही अवैध साठा केलेला नाही. माझा खुलासा आहे. असा खुलासा लेखी अर्जाव्दारे तहसिलदार यांना सादर केला.
हा सर्व खुलासा व माहिती ही शासनास खोटी दिली असून भारतीय दंड संहिता १९६० कलम १९९ व २०० तसेच अन्य कलमान्वये ठेकेदार यांचेवर गुन्हा दाखल करून शासनाची दिशाभुल केल्याबाबत यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी. तसेच तहसिलदार व नायब तहसिलदार खोटा पंचनामा तसेच खोटया रॉयल्टया स्विकारून रात्रीच्या अंधारात १० ब्रॉस रेतीची वाहतुक केली. त्यामुळे प्रती ब्रॉस २१०० प्रमाणे १० पट २१००० च्या तिनपट ६३००० अधिक स्वामित्वधानाचे ६०० प्रमाणे ६३६०० दंड आकारण्यात आला. हि सिध्दता असल्याने तहसिलदार व नायब तहसिलदार यांचेवर कारवाई करून निलंबन करण्यात यावे याकरीता काॅग्रेस कमिटीचे तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले, यावेळी भास्कर नागदेवते, जावेद पठाण तालुका उपाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना , व आदींची उपस्थिती होती.