Breaking News

चिमूर नगरपरिषदचे वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष – पप्पुभाई शेख

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चिमुर नगर परिषदला 17 , 18 महिन्यापासून प्रशासक असुन नगर परिषदेचे कोणत्याही प्रकारचे पूर्णपणे कामे होत नाही आहे. नगर परिषद ला कायमस्वरूपी मुखधिकारी नाही , सध्या प्रभारी आहे चिमूर तहसील चे नायब तहसीलदार दिनेश पवार त्यांनी जवळपास 7 ते 8 महिने काढले, त्यांनतर दिनांक 30 मे 2022 ला मुख्यधिकारी म्हणून पंकज सोनुने यांची नियुक्ती करण्यात आली आणि मग त्यांचा कडून पुन्हा दिंनाक 8 जुन रोजी पुन्हा पद काडून परत नायब तहसिलदार दिनेश पवार साहेब यांचेकडे देण्यात आले. हे काय चालु आहे. काही समजत नाही आहे.

तसेच अजुन पर्यंत दिव्यांग अपंग लोकांनासाठी जो 5 टक्के निधी योतो तो सुद्धा वाटप करण्यात आले नाही , पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब जनतेने पैसे खर्च करून मोलमजुरी सोडुन लाईनमध्ये लागुन घरकुल करिता फाईल तयार करून दिली ते सुद्धा अजूनही आली नाही , नगर परिषद क्षेत्रातील शेतकरी यांना अजुन पर्यंत कोणत्याही प्रकारचा लाभ नाही असे किती प्रकारचे कामे आहे होत नाही आहे.

1 वर्षांपासून कचरागाडी बंद आहे. नगर परिषद क्षेत्रातील 17 प्रभागात 17 कचरा गाड्या आले ते सुद्धा दिसत नाही फक्त 1 कचरागाडी आणि 1 ट्रॅक्टर दिसते बाकी कचरागाडी गेलीकुटे याचा सुद्धा नगर परिषचे प्रशासक यांचे लक्ष नाही समोर पावसाळा लागला अजुन पर्यंत प्रभातल्या नाल्या साफ झाल्या नाही पूर्ण भरून आहे पाऊस आला की पुर्ण पाणी लोकांचा घरी घुसणार किंवा रोडवर रहाणार,तसेच सातनाल्याची खोलीकरण झाले नाही तो सुध्दा पाणीचा थोप वर मारणार , पाईपलाईन चे नवीन कामे काही झाले काही बाकी आहे.

ज्या प्रभागात कामे झाली त्या प्रभागात काही ठिकाणी सिमेंट रोड फोडला काही ठिकाणी गट्टू लावले होते ते सुद्धा काडून पाईपलाईन टाकली परंतु फोडलेले ठिकाणी सिमेंट रोड तयार केले नाही. गट्टू कडले आणि त्यांनी नेले परत लावले नाही. अश्या ठिकाणी खड्डे पडुन आहे नगर परिषदने लाखो रुपयाचे निधी आणुन खर्च करून कामे करण्यात आले आणि आता पुन्हा तोच हाल आहे याकडे नगर परिषदचे प्रशासक यांना कितीवेडा आम्ही निवेदन दिले परंतु याकडे लक्ष देत का नाही.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved