
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आज दिनांक २७/०६/२०२२ला चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रीयेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्नीपथ योजना जाहीर केली आहे. या अग्नीपथ योजनेच्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस डॉ.अविनाशभाऊ वारजुकर यांचे मार्गदर्शयानुसार चिमूर तालुका काँग्रेस कमेटी व शहर काँग्रेस कमिटी तर्फे तहसील कार्यालय समोर चिमूर येथे केंद्र सरकार विरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले,
या आंदोलनात चिमूर तालुका अध्यक्ष संजय घुटके, कार्याध्यक्ष विजय गावंडे, महिला अध्यक्षा सविताताई चौधरी , शहर अध्यक्ष अविनाश अगडे , मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख , उपाध्यक्ष अमोल जुनघरे , ता.उपाध्यक्ष राजेश चौधरी , विनोद राऊत , धनराज मालके , विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोशन ढोक , उपाध्यक्ष प्रशांत डवले , विलास मोहिणकर , योगेश अगडे , विलास पिसे,देवा कावळे , अमित मेश्राम , नंदुकुमार गावंडे , दीपक कुंभारे , घनश्याम रामटेके , वामन डांगे , सुभाष बन्सोड , कल्पना इंदुरकर ,शहेनाज आंसारी , रिता आंबदे , दिक्षा भगत , गीता रानडे , तसेच इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.