
वर्धा प्रतिनिधी
वर्धा:-सावली.शेतकऱ्यांनी पेरलेले विक्रांत सोयाबीन उगवले नसून कंपनीने आमची फसवणूक केली आहे. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरापाई द्यावी अशी मागणी वर्धा तालुक्यातील सावली गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी २७ जून रोजी तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग पंचायत समिती वर्धा तसेच जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांना निवेदन दिले,
पेरणीयोग्य पाऊस आल्याने सोयाबीन ची पेरणी १९ जून रोजी पेरणी केली त्यानंतर पाऊस पडून सोयाबीन अंकुरले नाही बसंत कंपनीने आमची फसवणूक केली आहे यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्याचा परिणाम शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे लवकरात लवकर पंचनामे करून योग्य तो मोबदला द्यावा नाहीतर शेतकरी आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेईल असा इशारा निवेदनातून दिला आहे निवेदन देतेवेळी शेतकरी धनंजय गुळघाणे, संजय वाघमारे, विठ्ठल गुळघाणे, निलेश वैद्य,किशोर मुंगले, सुरज गुळघाणे, रवींद्र बोरकर, सुमित गुळघाणे उपस्थित होते.