
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-पळसगाव(पिपर्डा)चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्या जाणा-या स्पर्धा पुरस्कारांचा निकाल जाहीर करण्यात आला , आणि आज 1 ऑगस्ट 2022 रोजी पुरस्कारांचे वितरण करण्याचे आले त्यात चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ताडोबा बफर झोन क्षेत्रातील आदिवासी दुर्गम भागातील पळसगाव येथील दैनिक लोकमतचे पळसगावचे प्रतिनिधी विकास खोब्रागडे यांना यंदाचा ग्रामीण वार्ता पुरकाराचे मानकरी ठरले आहेत,
शिक्षणमहर्षी तथा माजी आमदार स्व. श्रीहरी बळीराम जीवतोडे स्मृतीप्रित्यर्थ ग्रामीण वार्ता पुरस्कारांचे प्रथम मानकरी विकास खोब्रागड़े ( लोकमत -पळसगाव (पि)यांना मा माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते आज श्रमिक पत्रकार भवन चंद्रपूर येथे वितरण करण्यात आले,ग्रामीण भागातील पत्रकार, यांच्यातील प्रतिभेला वाव मिळावा, त्यांना कसदार पत्रकारिता करता यावी आणि लोकांच्या समस्यांचे जलद निवारण आणि निराकरण साठी प्रयत्न करून त्यांचा दर्जा उंचावत राहावा, या उद्देशाने श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने हा उपक्रम अव्याहतपणे राबविला जात आहे,
या वेळी माजी अर्थमंत्री व वनमंत्री, सुधीरभाऊ मुनगंटीवार,राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे,राज्य उपाध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ,सुनील देशपांडे,बाळू हुनगुंद माजी अद्यक्ष कर्मवीर पुरस्कार,,यशवंत मुललेमवार कर्मवीर पुरस्कार प्राप्त,अजहर अली,बाळू रामटेके,प्रशांत विघणेश्वर,पत्रकार मंडळी मान्यवर मंडळी यांची उपस्थिती मध्ये पार पडला.