जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दिनांक 22/08/2022 रोजी रात्रो दरम्यान पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत आमडी येथे अवैध दारुची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन आमडी गावातील बंडु दामोधर भलमे, यशवंत पांडुरंग पांडे, अरुण अजाब बगने व ईतर गावकऱ्यांच्या मदतीने दारुबंदी कार्यवाही केली असता आरोपी 1) शामसुंदर शालीक गायकवाड 2) सागर चंदु चौखे दोन्ही रा. खानगांव हे बजाज पल्सर मोटार सायकल क्र. MH-34-AC-3452 ने अवैधरित्या दारुची वाहतुक करीत होते,
यापैकी आरोपी क्र. 2 सागर चौखे हा फरार झाला असुन आरोपी वाहतुक करीत असलेल्या चुंगडीमध्ये एकुण 3 दारुच्या पेटया प्रत्येक पेटीमध्ये 48 नग याप्रमाणे एकुण 144 नग देशी दारु प्रत्येकी 180 मि.ली. मापाची किंमत 14,400 तसेच मोटार सायकल किंमत 30,000 रु. असा एकुण 44,400 रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपीविरुध्द रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
सदरची कार्यवाही मनोज गभने पोलीस निरीक्षक पो.स्टे. चिमूर यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार मोहन धनोरे, पोलीस अंमलदार प्रमोद गुट्टे, चालक पोलीस हवालदार कैलास वनकर यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शरद मानकर करीत आहेत.