Breaking News

राष्ट्रसंत तुकडोजी पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर

= लेखा परीक्षण अहवालानुसार घोटाळा बाहेर

= माजी व्यवस्थापक व मुख्य लीपिकाचा प्रताप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सह पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर झाली असून माजी व्यवस्थापक व मुख्य लिपिक यांनी हा प्रताप घडऊन आणला असून लेखा परीक्षांनातून घोटाळा समोर,
सविस्तर वृत्त चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सह पत संस्था मधे सन २०१२ ते २०२१ या नऊ वर्षात सात कोटी ६५ लाख ५२ हजार रुपयाची अफरातफर झाली, असा आरोप संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि संचालकांनी केला, या संपूर्ण घोाळ्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे, माजी व्यवस्थापक मारुती पेंदोर, मांनद सचिव अरुण मेहरकुरे, अमोल मेहरकुरे, अतुल मेहेरकुरे, आणि इतरांना संगनमत करून या पत संस्थेत आर्थिक गैव्यवहार केला, असा आरोप पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष पुंडलीक मांढरे, संचालक विनोद शिरपूरवार, उमेश कुंभारे, प्रवीण वैद्य, मोहन हजारे, व्यवस्थापक गिरिधर मोहिंनकर, यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पतसंस्थेच्या माजी पदाधीकर्यानी संगनकावर बनावट नोंदी घेतल्या, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तीच्या नावावर बनावट व्यवहार केले. हा प्रकार दीड वर्षापूर्वी निदर्शनास आला, तेव्हाच पोलिसात तक्रार दाखल केली, सहायक निबंधकानी या कालावधीतील व्यवहाराचे लेखा परीक्षण केले, या लेखा परीक्षणात अरुण मेह्ररकुरे व त्यांच्या परिवारातील सदस्य या आर्थिक गैरव्यवहारात सामील असल्याचे दिसून आले, यात सात कोठी ६५ लाख ५२ हजार ४०८ रुपयांची अनियमितता असल्याचे दिसून आले, संस्थेच्या मासिक सभेत या घोटळ्याची पोलीस विभागात तक्रार करण्यात आली आहे, या गैरव्याहरतील रकमेच्या वसुलीचे अधिकार उपलेखा परीक्षक राजेश लांडगे याना देण्यात आले आहे, संस्थेने दिलेल्या अधिकार प्रमाणे चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved