Breaking News

“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यरत महिलांची आरोग्य तपासणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर: “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानांतर्गत जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्या मार्गदर्शनात मा.सा. कन्नमवार सभागृहात जिल्हा परिषद चंद्रपूर येथे विविध विभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.  यावेळी, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, प्रियंका रायपुरे, डॉ. ढवस, डॉ. ऋतुजा मुंधडा, डॉ. दीप्ती श्रीरामे, डॉ. प्राची मेहुलकर, डॉ. माधुरी मेश्राम, डॉ. मिना मडावी, डॉ.अमित जयस्वाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या मोहिमेचा शुभारंभ शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीमती चव्हाण यांनी उपस्थित महिलांना आरोग्य शिबिरात आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. व स्वतः तपासणी करून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे व त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष न करता आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन मार्गदर्शनातून केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या शिबिरामध्ये 105 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात उच्च रक्तदाबाचे 11, मधुमेहाचे 6, तर मधुमेह-उच्च रक्तदाबाचे 7 रुग्ण आढळून आले. सीबीसी थायरॉईड तपासणी 103 तर 15 महिलांची दंतरोग तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. पराग जीवतोडे, सुरेखा सुत्राळे, दोस्ना बागेसर, किशोर मोते, नितीन झोडे, भास्कर पाचभाई, सुरज राखडे, श्री. जुमनाके, टाटा ट्रस्ट व आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved