
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
पाथरी:- आज दिनांक 2/10/22 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जयंतीचे औचित्य साधून पोलीस स्टेशन पाथरी व ग्रामपंचायत पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी येथे
पोलीस स्टेशनचे आवारामध्ये आगामी सण उत्सव, ग्राम स्वच्छता, कृषी योजना बद्दल माहिती व इतर कार्यक्रमाबाबत जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संबंधाने पोलीस स्टेशन पाथरी तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना फळ व टिफिनचे वाटप पोलीस स्टेशन पाथरी तर्फे करण्यात आले.
सदर कार्यक्रमाकरिता तहसीलदार परीक्षित पाटील, ठाणेदार मंगेश मोहोड, नायब तहसीलदार कांबळे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती गोडसे, उपसरपंच प्रफुल तुम्हे तसेच शेजारील गावातील पोलीस पाटील व नागरिक हजर होते.