
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी येथे आज दिनांक 30 ऑक्टोबर 2022 ला सकाळी सहा वाजता नेरी येथील गांधी वार्डातील खाती मोहल्ला ते डोंगरे राईस मिल च्या सार्वजनिक रोडवर साफसफाई केलेल्या कचऱ्यामध्ये सुगंधी तंबाखूचे पॉकेट आढळून आले,
परंतु राज्यात 20 जुलै 2012 पासून एक वर्षाकरिता तंबाखू पदार्थाच्या उत्पादन ,साठा, वितरण अथवा विक्री यावर बंदी घालण्यात आली. 19 जुलै 2013 रोजी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती, तसेच 2015 पासून सरकारने प्रक्रिया केलेला तंबाखू तसेच सुगंधी तंबाखू यांच्या विक्री तसेच तंबाखूच्या प्रक्रियेवर बंदी घातली मात्र नेरीत आजही तंबाखूचे खाली झालेले पॉकेट दिवाळीची साफसफाई केलेल्या कचऱ्यात मिळतात व तो कचरा सार्वजनिक रस्त्यावर आणून बिनधास्त टाकल्या जातो,
याचा अर्थ असा की नेरीमध्ये तंबाखू विक्री जोरात सुरू असून खाली झालेले सुगंधी तंबाखूचे पॉकेट सार्वजनिक रोडवर सर्रास टाकतात त्यामुळे कायद्याचा धाक उरलेला नाही तरी पोलीस विभाग आणि एफडीआय यांनी एकत्रित कारवाई करून नेरीत होणारी तंबाखू विक्री बंद करावी अशी जनतेची मागणी आहे.