
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आज दिनांक 2/11/2022 ला टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप चिमूर चे शहराध्यक्ष रोहन नन्नावरे यांच्या नेतृत्वात झोपडपट्टीतील लहान मुलांना कपडे आणि स्त्रियांना साडी वाटप करून केक कापून अश्या वेगळ्या पद्धतीने पैलवान तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी टायगर ग्रुप मित्र परिवार यांच्या सौजन्याने प्रमुख उपस्थिती श्रीहरी सातपुते माजी शिवसेना तालुका प्रमुख व तालुका संघटक रोशन जुमडे, प्रसिद्धी प्रमुख सुनिल हिंगणकर सह शार्दुल पचारे युवा सेना तालुका प्रमुख, तसेच आयोजन रोहन नन्नावरे टायगर ग्रुप चिमूर शहराध्यक्ष, टायगर ग्रुप सदस्य विकास जाबुडे, निखिल गिरी, विशाल शिवरकर, तालीम शेख ,विशाल शेंडे, पवन झाडे, अजय मोहिनकर, पवन डोंगरवार, डेविड मसराम, दुर्गेश हजारे, शुभम जाबुडे आदी उपस्थित होते.