Breaking News

मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीर

19 व 20 नोव्हेंबर तसेच 03 व 04 डिसेंबर रोजी आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 17 : विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 19 व 20 नोव्हेंबर तसेच 03 व 04 डिसेंबर 2022 या दोन्ही शनिवार व रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरीकांना सदर शिबिरात नवीन मतदार नोंदणी करणे, मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणी करणे, मय्यत, स्थलांतर व दुबार मतदारांची वगळणी करता येईल. तसेच 09 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीची तपासणी करून मतदार यादीवर काही आक्षेप असल्यास त्यांचे दावे व हरकती देखील शिबिरात स्विकारण्यात येणार आहे.

तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार निलेश गौंड यांनी केले आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

तीन अल्पवयीन मुलींना गावातीलच एका भामट्याने फुस लावून पळून नेले-पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक 25 एप्रिल 2024 वार गुरुवार याबाबत सविस्तर वृत्त असे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved