Breaking News

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पॉलिक्लिनिक डायगनोस्टिक सेंटर्स चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुबई: मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा विनामूल्य उपलब्ध उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे दवाखाने सुरू करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात असे ५१ दवाखाने मुंबई शहरात सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून मुंबईतील २२७ वॉर्डमधील प्रत्येक २५ हजार लोकसंख्येमागे एक याप्रमाणे टप्याटप्याने हे दवाखाने सुरू होणार आहेत. या दवाखान्यात तब्बल १४७ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्याही गोरगरीब रुग्णांना मोफत उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे सरकार आणण्याचा प्रयत्न आम्ही केला असून आजच्या मुहूर्तावर सूरू होणारे हे दवाखाने हीच स्वर्गीय बाळासाहेबांच्या चरणी खरी श्रद्धांजली असल्याचे मत याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मुंबईतील धारावी पासून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली असून लवकरच धारावीच्या पुनर्विकासाला सुरूवात करून त्यांचे ते स्वप्नही पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासमयी दिली.

याप्रसंगी मुंबई शहरचे पालकमंत्री व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, महिला आणि बालकल्याण मंत्री तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबलसिंह चहल, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सध्या जॉब च्या शोधात महाराष्ट्रातील हजारो तरुण आहेत.याचाच फायदा या पुण्यातील टोळीने घेयला सुरु केले आहे

*जनहितार्थ* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-सगळ्यांलाच चांगला जॉब वेळेवर भेटत नाही यामूळ तरुण …

केंद्रीय मंत्रिमंडळ;कोणाला कोणते खाते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved