
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे: धुळे शहरातील गाजलेल्या चिनु उर्फ चंदन पोपली खुनाच्या खटल्यातील संशयित आरोपी कपिल लिंगायत व भटु चौधरी यांना धुळे कोर्टातून जामीन मिळाला आहे. व यासिन पठाण याचा जामीन अर्ज मे. कोर्टाने फेटाळले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळे शहरातील चिनु उर्फ चंदन पोपली याचा कुमारनगर भागात दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी पैशाच्या वादातून गावठी रिव्हॉल्वरने खून झाला होता. या गुन्हयात तीन जणांचे नाव समोर आले होते. त्यापैकी कपिल लिंगायत यास धुळे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मा. मोहंमद साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश साो. यांच्या न्यायालयात सदर केसचे कामकाज चालले. दोघांना मा. मोहंमद साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब यांनी जामीन मंजूर केला आहे. कपिल लिंगायत याच्यातर्फे सुप्रसिध्द वकील अॅड. मोहन भंडारी व अॅड. चैतन्य भंडारी यांनी काम पाहिले.