Breaking News

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत भ्रष्टाचार -आम आदमी पार्टीचा आरोप

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

विद्युत वितरण कंपनीचा गलथानपणा चव्हाट्यावर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : सामान्य शेतकऱ्यांना शेतात वीज पोहचावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील 300 शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये बुडाले. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला आहे.

विद्युत वितरण कंपनीने सीआरआय कंपनीला शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्याचे काम दिले. एका शेतकऱ्यामागे विद्युत वितरण कंपनीने सी आर आय कंपनीला पाच एचपी साठी अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये सरकार ने दिले. कंपनीकडे दुरुस्ती देखभाल करण्यासाठी पाच वर्षाचा करार होता. सीआरआय कंपनीने विवेक वर्मा या कंत्राट दाराकडे इन्स्टॉलेशनचे काम दिले. 2019 पासून ते काम करीत होते. विद्युत वितरण कंपनीच्या देखरेखित हे काम करायचे होते पण विद्युत वितरण कंपनीच्या कमिशनखोरीमुळे शेतकऱ्यांना सर्व इन्स्ट्रुमेंट निकृष्ट दर्जाचे व बोगस लावल्या गेले.

विशेष म्हणजे सोलर पम्प घेतलेल्या शेतकऱ्यांना दहा वर्षापर्यंत विद्युत पुरवठा मिळणार नाही असा तुघलकी नियम लावण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली.
चंद्रपूर तथा गडचिरोली जिल्ह्यात एकूण 511 पंप लावण्यात आले. फक्त पाच टक्के लोकांचे पंप सुरू असून, बाकी सर्व पंप बंद आहेत असे आम आदमी पार्टीच्या चौकशीत आढळले.
काही शेतकऱ्याच्या पंपाला प्रेशर नाही, स्ट्रक्चर तुटलेले आहे, पाणी मिळत नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. मागील चार वर्षापासून पंप काम न केल्यामुळे वार्षिक उत्पन्नाचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे म्हणून शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सी आर आय कंपनीने शेतकऱ्याचा स्पॉट सर्वे केलाच नाही. फोनवरून विचारण्या करूनच थातूरमातूर सर्वेक्षण करून काम करण्यात आले. सर्वे करण्यासाठी शेतकऱ्याकडून दोनशे रुपये मागण्यात आले. परंतु ते काम कंपनीचे होते. प्रत्येक शेतकऱ्याकडून 16 हजार पाचशे रुपये पंपाकरीता डिमांड घेण्यात आला. ट्रान्सपोर्ट ,स्ट्रक्चर उभे करण्यासाठी जवळपास गरीब शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये अतिरिक्त खर्चाच्या नावाने खोटी माहिती देऊन वसूल केले .एकूण तीस ते पस्तीस हजार रुपये शेतकऱ्याचा खर्च झाला. डिमांडवगळता सर्व कामे कंपनीने करायचे होते, असा नियम आहे. जो शेतकरी जास्तीचे पैसे मोजेल त्याचा नंबर लवकर लावण्यात येतो.

त्याला तात्काळ मोटर देण्यात येते. स्ट्रक्चर उभे करताना कंपनीने स्वता न करता निरक्षर शेतकऱ्याला करायला लावले. नवीन लावण्यात आलेले सर्व पंप दोन ते तीन महिन्यात बंद पडले. पाणी बंद व पंप बंद पडल्यामुळे पाणी उपसा न झाल्यामुळे बोरवेल कॉलॅप्स झाल्या . विहिरीसाठी 30 मीटरचा पंप पाहिजे होता. प्रेशर चांगले येण्यासाठी .परंतु टेक्निकल ज्ञान नसल्यामुळे 70 मीटरचा लावला त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला. शेतकऱ्याला वारंवार ऑनलाईन तक्रार करायला लावायला भाग पाडत होते. किंवा विद्युत वितरण कंपनीची उंबरठे झीजवायला लावत होते. तरच टेक्निशियन येत होता. पुन्हा निकृष्ट दर्जाचे पंप असल्यामुळे चार-पाच दिवसातच पुन्हा बंद पडत होता. त्यामुळे सर्व शेतकरी वैतागले होते.

कंपनीला कॉल करून सुद्धा कंपनीकडून उडवा उडवी ची उत्तर देण्यात येत होती पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी येईल असे सीआर आय कंपनीचे प्रमुख थोरात साहेब यांच्याकडून सांगण्यात येत होते. इन्शुरन्स पाच वर्षाचे होते. यात चोरी जाणे किंवा वादळाने पडणे सीआरआय कंपनी इन्शुरन्स कंपनीची संलग्न असल्यामुळे तात्काळ मदत मिळत नव्हती. पण ज्यांना टेक्निकल चे काहीच नॉलेज नाही अशा लोकांनी काम केल्यामुळे काम खराब झाले व त्याचा भुर्दंड गरीब शेतकऱ्याला बसला गरीब शेतकऱ्याला सोलर घेतल्यामुळे इलेक्ट्रिक मिळणार नाही, असे सांगितले. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला पैसे मोजले तर तात्काळ कनेक्शन देण्यात येते ही बाब चौकशीत जाणवली.

जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्याचे तीस हजार रुपये प्रमाणे साधारण 90 लाख रुपये अग्रीम खर्च केलेले बुडाले. तसेच तीन लाख वार्षिक उत्पन्न प्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्याचे 37 कोटी रुपयांची नुकसान झाले.
पाणी नसल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. येत्या दहा दिवसात शेतकऱ्याचा प्रश्न सोडवा नाहीतर आम आदमी पार्टी विद्युत वितरण कार्यालयात शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिला आहे,

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार,जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी,शहर सचिव राजू कूड़े,महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे,अश्रफ सय्यद,योगेश मुरेकर, सुनिल सदभय्ये,सुधीर पाटील, रेहमान खान, सुभाष दुर्योधन इत्यादि सोबत शेतकरी दत्तू उरकुड़े,शकर गाडगे,विजय चिकटे,सुरेश मुसले,सुरेश कष्टी,पीयूष करलुके,जीवन ठेंगने,रामराव संभा वासेकर, दिपक लक्ष्मण राव बेरर्षेट्टीवर, अनिल देविदास चिडे, प्रशांत ईश्वर उराडे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved