
चिमूर शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-स्वराज्य निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने तीव्र पडसाद चंद्रपूर जिल्हा सहित चिमूर तालुक्यामध्ये पण उमटले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चिमूर तालुक्याच्या वतीने आज दिनांक 22 नोव्हेबर रोजी हुतात्मा स्मारक येथे निषेध आंदोलन करण्यात आले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्वरित पदावरून हटवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालची पाठराखण करीत आहे त्यांनी जनतेची माफी मागावी, राज्यपाल शिवद्रोही असल्याचा आरोप माजी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे यांनी केला असून यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले,
यावेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख सारंग दाभेकर, सोंदरी ग्राम पंचायत सरपंच तथा उपतालूका प्रमुख केवळराम पारधी, माजी उपजिल्हा प्रमुख अनिल डगवार, तालुका संघटक रोशन जुमडे, तालुका समन्वयक देविदास गिरडे, उपतालुका प्रमुख रामभाऊ धारणे, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, माजी उपतालुका प्रमुख मनोज तिजारे, विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, चिमूर शहर प्रमुख सचिन खाडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख राज बुचे, प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर, ओम थुटे, गोपाळ भजभुजे, उपस्थित होते.