“छोटे मोटे सब बोलेंगे बाबा तेरी जय बोलेंगे” व “गोविंदा – गोविंदा” च्या जयघोषाने चिमूर क्रांतीनगरी दुमदुमली
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या कलस यात्रेत “छोटे मोटे सब बोलेंगे बाबा तेरी जय बोलेंगे” या जयघोषनेने संपूर्ण चिमूर क्रांतीनगरी दुमदुमली. श्री रामदेवबाबा भक्त मंडळच्या वतीने दिनांक ४ सप्टेंबर ला रात्री जम्मा जागरण निमित्त हैद्राबाद येथील श्री. रामदेव बाबा यांचे परम भक्त सुशील गोपालजी बजाज व त्यांच्या चमुंचा भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . दिनांक ५ सप्टेंबर ला सकाळी पाच वाजता भजन सध्याची आरती तसेच दुपारी ४ वाजता श्री रामदेव बाबा मंदिर येथून भव्य कलस शोभा यात्रा निघत मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत नेहरू चौक ते दुकान लाईन मार्गे श्री रामदेव बाबा मंदिरात पोहचली. या शोभा यात्रेत भजन, दिंडी, ढोल तासा पथक सह अनेक देवीदेवतेचे देखावे होते.
छोटे मोटे सब बोलेंगे बाबा तेरी जय बोलेंगे च्या जयघोषणेने भक्त गण तल्लीन झाले होते. या शोभा यात्रेत माजी आमदार मितेशजी भांगडिया, आमदार बंटी भांगडिया, भांगडिया फाउंडेशनचे चेअरमन श्रीकांत भांगडिया, पार्थ भांगडिया, मेघा भांगडिया, अपर्णा भांगडिया, निलम राचलवार, राजु देवतळे, मनीष तुंम्पलीवार, समीर राचलवार, ओमप्रकाश गनोरकर एकनाथ थुटे, अजहर शेख, संजय खाटीक, भिमराव ठावरी गोपाल बलदुआ, कमल असावा, टिमू बलदुआ, राजु बलदुआ, श्याम बंग, मंगेश धाडसे, कुणाल कावरे, बंटी वनकर, श्रेयस लाखे, संजय नवघडे आदी भक्त गण मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.