स्लॅग:-शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश इखार यांनी सूनविले बँक प्रशासनास खडे बोल
वर्धा – सुरज गुळघाने
तरोडा:- शेतकऱ्यानां नेहमीच अपमानित करीत कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवने ,शासकीय योजनेची अमलबाजवणी न करता शेतकऱ्यांना वेठीस धरने हा नित्याचाच प्रकार पंजाब नॅशनल बँक तरोडा येथे सुरू होता. या बाबत बँकेच्या वरीष्ठना अनेकदा लेखी तक्रार देऊन सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे ही बँक नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहली आहे .शेतकऱ्यांनी तक्रारीचा पाढा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश ईखार यांच्याकडे कथन केला. बळीराज्याला होणाऱ्या त्रासाची दखल घेत थेट बँक गाठली .आणि बँक कर्मचाऱ्यास खडे बोल सूनविले .शेतकऱ्यांना त्रास झाला तर बँकेस कुलूप लावू?अशा गर्भित इशाराही यावेळी बँक प्रशासनाला देण्यात आला.
जिल्हाधिकारी यांना संपर्क करून बँक कर्मचाऱ्यांच्या मनमानी मूळे शेतकऱ्यास होणारा त्रास दूर करण्याची मागणी करण्यात आली.प्रशासने लागलीच दखल घेत दीर्घ रजेवर गेलेल्या बँक मॅनेजर यांना रुजू होण्याचे आदेश दिले . शेतकरी कृषी कर्ज वाटप सुरळीत पणे करण्याबाबत सुद्धा यावेळी सूचना करण्यात आल्या .लेक लाडकी योजनेसाठी महिलावर्गाला त्रास होऊ नये याबाबत सूचना दिल्या अवघ्या काही तासातच बँकेचे कामकाज करण्यासाठी बँक मॅनेजर यांना पाचारण करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) गणेशईखार, उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, सावली येथील शेतकरी मनोहर चांभारे, निनाद बोरकर, भूषण झाडें, सुरज गुळघाने, किसनाजी कडू, प्रवीण चांभारे, धनराज चांभारे, राहुल कडू, पवन गुळघाने, महेश गुळघाने, सुधीर वाघमारे, अरविंदा बोरकर,राजूभाऊ बोरकर व असंख्य शेतकरी उपस्थित होते. तरोडा वासीयांनी यावेळी जिल्हाप्रमुख यांच्यासह शिवसैनिक यांचे आभार मानले.