Breaking News

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

भद्रावती :-  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचार मोहिमेला जोमाने सुरुवात केली आहे. जिवतोडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दावेदारी प्रस्थापित करत जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी १ हजार प्रचारक टी-शर्टचे वितरण केले आहे. या टी-शर्टच्या माध्यमातून वरोरा-भद्रावती विधानसभेत पक्षाचा प्रभाव वाढवणे आणि जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे हा उद्देश आहे.मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या प्रचारक टी-शर्टवर पक्षाचे चिन्ह, “लढणार, जिंकणार” हे घोषवाक्य तसेच जिवतोडे यांचे फोटो असून, त्याद्वारे जनतेपर्यंत पक्षाची दृढ प्रतिमा तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमामुळे तरुणांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे. जिवतोडे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले असल्याने त्यांचे तरुणांमध्ये खास आकर्षण आहे. वरोरा – भद्रावती विधानसभेत शेतकरी, विद्यार्थी आणि शेतमजुरांवरील प्रभाव आणि त्यांच्या समस्यांसाठी सतत आवाज उठवीत असल्याने त्यांचे स्थान अधिक दृढ होत आहे.जिवतोडे यांनी पक्षाच्या प्रचार मोहिमेचा एक भाग म्हणून आणखी विविध उपक्रम राबवण्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जिवतोडे यांनी सर्वतोपरी तयारी केली आहे. “लढणार, जिंकणार” या घोषवाक्याखाली जिवतोडे विधानसभेत विजय मिळवण्यासाठी आत्मविश्वासाने उभे आहेत.

या टी शर्टच्या लोकार्पण सोहळ्यात सिनेअभिनेते भारत गणेशपुरे,माजी उपजिल्हा प्रमुख वसंता मानकर नगरपरिषद माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी,माजी नगरसेवक सुधीर सातपुते, विनोद वानखेडे, राजु सारंधर,चंद्रकांत खारकर, निलेश पाटील,ज्येष्ठ शिवसैनिक बंडू डाखरे,सुधाकर मिलमिले,अमित निब्रड,बाळा क्षीरसागर, मंगेश ढेंगळे, अनिल सातपुते,दिनेश यादव,विपीन काकडे, संदीप मेश्राम,बंडू चटपल्लीवार,गणेश चिडे,महेश जिवतोडे,माजी नगरसेविका प्रतिभा सोनटक्के, शितल गेडाम, रेखा राजूरकर,शोभा पारखी,रेखा खुटेमाटे, लक्ष्मि पारखी, अनीतात मुळे, आशा निंबाळकर, सूनीता टिकले,कीर्ती पांडे आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved