Breaking News

चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील नाल्या बांधकाम मोजमाप न करताच सुरू

काम रीतसर न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा चंदू मडकमवार यांनी निवेदनाद्वारे दिला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील बाबासाहेब आंबेडकर कॉलोनी मधील नाल्या बांधकाम सुरू असून कोणताही मोजमाप न करता नाल्या बांधकाम सुरू असून नगर परिषद ने तात्काळ दखल घेऊन बांधकाम करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा चिमूर तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे तालुका अध्यक्ष चंदू मडकमबार यांनी दिला,चिमूर नगरपरिषदच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर कॉलोनी येथे नाली बांधकाम करण्यात येत आहे.

परंतु हे काम नियमानुसार होताना दिसत नाही, नाल्या बांधकाम करताना मोजमाप करणे आवश्यक आहे पण या ठिकाणी कोणताच मोजमाप न करता नाल्या बांधकाम सुरू असून भविष्यात अतिक्रमण झाल्यास त्याचा त्रास नागरिकांनाच निर्माण होईल त्यामुळे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता नगर परिषदने घेऊन नागरिकांना न्याय देण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी निवेदनात चिमूर तालुका राष्टरवादी काँग्रेस समिजिक न्याय सेलचे तालुका अध्यक्ष चंदू मडकमवार यांनी नगरपरिषदला दिला आहे,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑटो रिक्षा चालकांची नेत्र तपासणी व चष्म्यांचे वितरण

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 06: प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सामान्य …

तालुक्यातील विविध समस्यांबाबत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना राळेगावच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात , नाईलाजास्तव संघर्षास सज्ज जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-“नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved