
चिमूर शहरातील घटना —
डाग स्काड पथक व फिंगर प्रिंट तद्द घटनास्थळी दाखल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर = चिमूर शहरातील आबादीं वॉर्डत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चाकूचा धाक दाखवून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी चंद्रपूर वरून डॉग स्काड पथक व फींगर प्रींड तद्दण्याणा पाचारण करण्यात आले होते, चिमूर शहरातील आबादीं वॉर्ड येथील शेवंता तुकाराम हिंगनकर वय 78 वर्ष ही महिला घरी एकटी असताना दिनांक 13 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटाच्या दरम्यान आपल्या घरी झोपली असताना टेबल वाजल्याचा आवाज येताच उटून बसली असता तिच्या समोर एक व्यक्ती चाकु घेऊन उभा होता,
आणि दुसरा व्यक्ती दरवाज्याजवळ स्कार्फ बांधून उभा होता, चाकूचा धाक दाखवून तिच्याकडून च्याब्या हिसकाउन घेत कल्ला करू नको नाहीतर मारून टाकीन अशी धमकी देत त्या महिलेच्या गळ्यातील 10 ग्रामची सोन्याची चैन चाकुने हिस्कावली व दोघेही निघून गेले 10 ग्राम सोन्याची चैन अंदाजे किंमत 30 हजार रुपयेचा होता, महिला घाबरल्या अवस्थेत असल्यामुळे व भीतीने तिचा आवाज निघत नसल्यामुळे ही घटना सकाळी 7 च्या दरम्यान उघडकीस आली,
त्याच्या बाजूच्या किरयादारास माहिती होताच त्यांनी त्या महिलेच्या पुतण्या सुनील हिंगनकर यास फोन द्वारे माहिती दिली लगेच सुनील हिंगनकर यांनी पोलीस स्टेशनला जाऊन झालेल्या घटनेची नोंद केली, पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी घटनेची नोंद घेत तातडीने घटनास्थली भेट घेऊन कारवाईस सुरुवात केली, व मौका चौकशी करीत चंद्रपूर वरून डाग स्काड पथक व फिगर प्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले, वृत लीहेपर्यंत सदर घटनेची चौकशी सुरु होती, पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे व पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांचे मार्गदर्शनात फिंगर प्रिंट तद्द सहायक पोलिस निरीक्षक राहुल दिवसेलवार, पंकज उराडे, परिमल यादव, स्वान प्थक आर बी पाटील, उमेश रणदिवे सचिन भोजेकर, तसेच पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरदे कैलास आलाम प्रवीण गोन्नाडे करीत आहेत,