
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : –महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई शाखा चिमूर तर्फे प्रा.महेश पानसे पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक.०३ फेब्रुवारी २०२३ ला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे डॉ. बेंडले यांच्या उपस्थितीत उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे आंतर रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.
यावेळी केवलसिंग जुनी तालुका अध्यक्ष , प्रमोद राऊत उपाध्यक्ष , विलास मोहिणकर तालुका संघटक , आनंद भीमटे सह संघटक , कृष्णकुमार टोंगे सचिव , उपक्षम रामटेके उपाध्यक्ष ,सुनील हिंगणकर सदस्य , योगेश अगडे सदस्य व रुग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थिती होते.