
तिन वर्षानंतर भिसी कांपा जनता बस फेरी अखेर सुरु
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-भिसी ते कांपा जनता बस फेरी पूर्वरत सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायत चिचाळा शास्त्री चे युवा सरपंच अरविंद राऊत यांनी चिमूर आगार येथे आपल्या निवेदनामधून सादर केली होती.या संदर्भात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या सोबत अरविंद राऊत यांनी या संदर्भात चर्चा केली.भिसी कांपा मार्गावरील प्रवाशांना ये -जा करण्यासाठी किती त्रास होत आहे याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पाठोपाठ भिसी -कांपा मार्गांवरील आंबोली , गडपिपरी,पुयारदंड,लावारी, बोरगांव येथील ग्रामपंचायत नी सुद्धा पाठोपाठ निवेदन सादर केले, या अगोदर शाळेकरी विद्यार्थ्यांच्या वतीने सुद्धा निवेदन सादर केले होते.
अखेर या सर्व निवेदनाची दखल घेत निवेदनाला यश प्राप्त झाले व आज भिसी कांपा जनता बसफेरी सुरु झाली. भिसी ते कांपा जनता बस फेऱ्या कोरोना पूर्वी सुरू होत्या. परंतु कोरोना काळात बस सेवा बंद करण्यात आली. कोरोना प्रतिबंध हटल्यानतर सुद्धा भिसी कांपा जनता बस फेऱ्या सुरू न झाल्याने प्रवासी, वयोवृद्ध व्यक्ती महिला पुरुष व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. सर्व निवेदनाची दखल घेत भिसी कांपा बस पूर्ववत चालू झाली यामुळे या सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत आहे.
बस सुरु झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गडपिपरी बसस्टॅण्ड येथे शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात बस, व बस चे चालक, वाहक यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आंबोली ग्रामपंचायत चे
उपसरपंच वैभव ठाकरे बाळासाहेब बनसोड,मधुकरजी नागपुरे,मनोज सरदार,ललित हरडे,योगेश करारे, मिलिंद पाटिल व परिसरतील आदि गावकारी, प्रवाशी, विद्यार्थी, महिला व पुरुष उपस्थित होते.