गोपालकाल्याच्या कीर्तनाचे श्रीहरी बालाजी महाराज नवरात्र महोत्सवची सांगत
पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त
महाशिवरात्री पर्यंत सुरू राहणार घोडा रथ यात्रा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-पंचक्रोशित प्रसिद्ध अश्या चंद्रपूर जिल्हातील चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडा रथ यात्रा महोत्सव व नवरात्री प्रारंभ मिती माघ शुद्ध पंचमी 26 जानेवारी 2023 पासून हरी भक्त पारायण विनोद बुवा खोंड महाराज यांचे कीर्तनाचे सुरू झाला, मिती माघ शुद्ध सप्तमी 28 जानेवारी रोजी आश्र्वृढ रथाचे पूजन करण्यात आले, मिती माघ शुद्ध नवमी 30 जानेवारी रोजी गरुड वाहन परिक्रमा पूर्ण झाली, मिती माघ शुद्ध एकादशी 1 फेब्रुवारी रोजी मारोती वाहन परिक्रमा पूर्ण करण्यात आली, व मिती माघ शुद्ध त्रोदसी ला श्रीहरी बालाजी महाराज यांची अश्वरूढ रथावर पारंपरिक पद्धतीने परिक्रमा पूर्ण करण्यात आली.
मिती माघ कृष्ण पक्ष गुरू प्रतिपदा 6 जानेवारी रोजी गोपाळ काल्याचे किर्तनाने नवरात्री महोत्सवाची सांगता करण्यात आली गोपाळ काल्याचे प्रसंगी सुधा हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवत श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले, नवरात्री महोत्सव संपर्ण झाला असला तरी ही यात्रा मिती माघ कृष्ण पक्ष 18 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निलम राचलवार यांनी दिली.
या यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेता २६ जानेवारी पासून पोलीस विभाग कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे नेतृत्वत पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख व सुशीलकुमार सोनवणे पोलीस नाईक कैलास आलम व सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्र दिवस कर्तव्य बजावत होते.